
जोरात सुरू आहे ‘पठाण’चे शूटींग, सेटवरचे शाहरूख खानचे फोटो, व्हिडीओ
ठळक मुद्देयशराज बॅनरचा ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करतोय. या सिनेमात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.
बॉलिवूड किंग शाहरूख खानचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. साहजिकच ‘पठाण’कडे चाहते डोळे लावून बसले आहेत. सध्या दुबईमध्ये या सिनेमाचे शूटींग सुरु आहे आणि या सेटवरचे काही फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओत शाहरूख एक फाईट सीन शूट करताना दिसतोय. शाहरूख एका स्टंटपर्सनसोबत गाडीच्या छतावर चढतो. यानंतर या गाडीच्या छतावरच फाईट सीन सुरु होतो, असे या व्हिडीओत दिसतेय. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
#Pathan Movie @iamsrk is back with bang pic.twitter.com/vKlGZ5FVGp
— Shreshth Gehlot (@ShreshthGehlot2) March 10, 2021
काही दिवसांपूर्वी शाहरूखचा असाच एक व्हिडीओ लीक झाला होता. यात तो एक चित्तथरारक स्टंट करताना दिसला होता. त्याआधी बुर्ज खलिफासमोरच्या शूटींगचे फोटोही व्हायरल झाले होते.
तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘पठाण’ या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या बुर्ज खलिफामध्ये होत आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये बुर्ज खलिफा बाहेर दाखवण्यात आला आहे. मात्र पहिल्यांदाच या इमारतीच्या आतमध्ये एका भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल. आतापर्यंत हॉलिवूडमध्येही केवळ दोनच चित्रपटांचे चित्रीकरण बुर्ज खलिफाच्या आत झाले आहे. या दोन चित्रपटांमध्ये टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल : घोस्ट प्रोटोकॉल’ आणि विन डीजल, ड्वेन जॉनसन आणि पॉल वॉकर स्टारर ‘फास्ट अँड फ्युरियस 7’ यांचा समावेश आहे.
Team Pathan with the camera guys reached UAE yesterday, they have started shooting plates at 4am in downtown, Dubai.
Some more snaps of the King @iamsrk from #Pathan shooting place…
Enjoy guys… ️ pic.twitter.com/GhlxlJXxhV— Deb The King Of The Hearts (@I_AM_DEBESH) January 27, 2021
यशराज बॅनरचा ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करतोय. या सिनेमात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे किंगखानला पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.